नक्‍की वाचा ! सोलापुरातील 23 केंद्रावर रविवारी 'नीट'ची परीक्षा

नक्‍की वाचा ! सोलापुरातील 23 केंद्रावर रविवारी 'नीट'ची परीक्षा

  • उद्या (रविवारी) होणार दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार परीक्षा 
  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेच्या दोन तास अगोदर राहावे लागणार हजर 
  • प्रत्येक विद्यार्थ्यांचे केले जाणार थर्मल स्क्रिनिंग; मास्क, हॅण्डग्लोज बंधनकारक 
  • तापसदृश्‍य तथा आजारी असलेल्या विद्यार्थ्यांची केली जाणार स्वतंत्र सोय 
  • एका वर्गात किमान 24 विद्यार्थीच बसणार; सोशल डिस्टन्सिंगचे केले जाणार पालन 
  • परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यास दिले जाणार स्वतंत्र मास्क 
1neet_2 - Copy.jpg

सोलापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (नीट) वतीने वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी परीक्षा उद्या (रविवारी) सोलापूरासह देशभरात होईल. या परीक्षेचे सोलापूर शहर आणि पंढरपूर व अक्‍कलकोट येथे 23 केंद्र आहेत. सोलापुरातील या केंद्रांवर आठ हजार 228 जास्त विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा समन्वयक प्रा. एस. डी. शिरगावे यांनी दिली. 

कोरोनामुळे यंदा परीक्षेसाठी तीन महिन्यांचा विलंब झाला आहे. कोरोनाच्या संसर्ग काळात ही परीक्षा होत असून संबंधित एजन्सीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रविवारी (ता. 13) दुपारी 2 ते 5 या वेळेत ही परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेपूर्वी दोन तास अगोदर बोलावण्यात आले आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे परीक्षा केंद्रावर जाताना हॉडग्लोज, मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच परीक्षा केंद्रात जात असताना विद्यार्थ्यांना नवीन मास्क दिले जाणार असून प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत समस्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना औषधे आणि फळे घेऊन जाता येणार आहेत. सर्व सूचनांचे पालन करणे परीक्षार्थींना बंधनकारक असून सोशल डिस्टन्सिंगचे यावेळी पालन केले जाणार आहे. 

ठळक बाबी... 

  • उद्या (रविवारी) होणार दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होणार परीक्षा 
  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेच्या दोन तास अगोदर राहावे लागणार हजर 
  • प्रत्येक विद्यार्थ्यांचे केले जाणार थर्मल स्क्रिनिंग; मास्क, हॅण्डग्लोज बंधनकारक 
  • तापसदृश्‍य तथा आजारी असलेल्या विद्यार्थ्यांची केली जाणार स्वतंत्र सोय 
  • एका वर्गात किमान 24 विद्यार्थीच बसणार; सोशल डिस्टन्सिंगचे केले जाणार पालन 
  • परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यास दिले जाणार स्वतंत्र मास्क  

'हे' आहेत सोलापुरातील परीक्षा केंद्रे 
सिहंगड कॉलेज, सिहंगड पब्लीक स्कूल, व्हीव्हीपी पॉलिटेक्‍निक महाविद्यालय, सोनी कॉलेज, सिध्देश्‍वर वूमन्स कॉलेज, ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, केएलई स्कूल, संगमेश्‍वर कॉलेज, बीएमआयटी कॉलेज, अण्णप्पा काडादी प्रशाला, ऑर्चिड स्कूल, डब्ल्यूआयटी, सुयश गुरूकुल, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएमएस स्कूल, दमाणी हायस्कूल, अक्‍कलकोट, पंढरपूर येथील 23 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर अंतर्गत 65 उमेदवारांची भरती